⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

सुटाबुटात चारचाकीने आलेल्या चोरट्यांचा भरदिवसा, भरवस्तीत डल्ला, लाखोंचा ऐवज लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२२ । भुसावळ येथील शिवपूर कन्हाळा राेडवरील शिव काॅलनीतील समर्थ अपार्टमेंटमधील बंद घर फोडून चाेरट्यांनी २ लाख रोख व दागिने मिळून ८ लाखांचा ऐवज लांबवला. विशेष म्हणजे चाेरटे दुपारी १ वाजेच्या सुमारास कारमधून सुटाबुटात आले हाेते. त्यांनी बंद घराचे कुलूप तोडून अवघ्या २० मिनिटांत चाेरी करून कारमधून पलायन केले.

बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असलेले रघुनाथ चुडामण चौधरी (वय ५५, रा. शिव काॅलनी, भुसावळ) हे कुटुंबासह महामार्गाजवळील शिवपूर-कन्हाळा रस्त्यावरील शिव कॉलनीतील समर्थ अपार्टमेंटमध्ये राहतात. या अपार्टमेंटमध्ये ९ परिवार वास्तव्यास आहेत. चौधरी कुटुंबातील सदस्य शनिवारी श्री,क्षेत्र शिरसाळा येथे दर्शनासाठी गेले हाेते. केवळ कुटुंबातील मोठी सून घरी होती. त्या देखील दरवाजाला कुलूप लावून शेजारील नातेवाइकांकडे गेल्या हाेत्या. दुपारी १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान अपार्टमेंट जवळ पांढऱ्या रंगाची कार येऊन थांबली. त्यातून तीन जण खाली उतरले. परिसरातील नागरिकांनी त्यांच्याकडे पाहिले. मात्र, काेणाकडे पाहुणे आले असावे असे वाटले. एक जण कारमध्ये बसून मोबाइलवर बाेलत हाेता. दरम्यान, तिघांनी पहिल्या मजल्यावरील चौधरी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील २ लाखांची रोकड, १३ ग्रॅमचे प्रत्येकी दोन नेकलेस, अंगठ्या, लहान मुलांचे दागिने, कानातले टॉप्स असा एकूण ८ लाखांचा मुद्देमाल लांबवला. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे निरीक्षक राहुल गायकवाड, एपीआय हरीष भोये व डीबी पथकाने चौकशी सुरू केली.सीसीटीव्हींचा अभावचोरी घडली त्या अपार्टमेंटसह परिसरात जवळपास कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. यामुळे चोरटे नेमक्या कोणत्या वाहनात आले? त्यांचा रंग, वाहनाचा क्रमांक कळण्यास पोलिसांना अडचणी आल्या मात्र. स्थानिक नागरिकांकडून मिळलेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांकडून डाटा जमवला जात आहे. त्यानुसार तपासाची पुढील दिशा ठरेल. तूर्त ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला बोलावण्यात आले. श्वानाने घरफोडी झालेल्या इमारतीभोवती चक्कर मारला. नंतर ते तेथेच घुटमळले. दरम्यान, घरफोडी झालेल्या घरापासून अवघ्या काही मीटर अंतरावर महामार्ग असल्याने चाेरटे येथून पळाल्याचा अंदाज आहे.

दोन कुलपे असल्यामुळे बाजूचे बंद घर सुरक्षित

रघुनाथ चौधरी यांच्या फ्लॅट समोरच जळगाव धर्मदाय आयुक्त विजय दिनकरराव नेमाडे व अ‍ॅड.राधिका नेमाडे-वाणी राहतात. हे कुटुंबही बाहेरगावी गेले हाेते. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप हाेते. हे कुलूप तोडण्याची संधी चोरट्यांनी साधली. मात्र, घराला दोन कुलपे असल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला.

हे देखील वाचा :