दोन अल्पवयीन मुलांना फूस लावून पळविले

फेब्रुवारी 18, 2022 9:46 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील बिलाखेड येथे दोन अल्पवयीन मुलांना फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. रोहीत संजय पाटील (वय-१७) व शुभम बापू लोखंडे (वय-१७रा. बिलाखेड) असे या मुलांची नावे असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 1 jpg webp

२० ऑक्टोबर २०२१ रोजी रोहीत व शुभम हे दोघेही राहत्या घरातून दुचाकीवरून (क्र. एम.एच.१९ बीबी ५९८८) कुठेतरी निघून गेले आहेत. त्यावर घरच्यांनी परिसरासह नातेवाईकांकडे शोधाशोध केली असता दोघेही मिळून आले नाही. म्हणून त्यांचा अज्ञानाचा फायदा घेऊन अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहेत.

संजय वामन पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि विशाल टकले हे करीत आहेत.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now