जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । यावल तालुक्यातील आडगाव येथे गटारीच्या सांडपाण्यावरून एकाला पाच जणांनी मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
आडगाव येथील रवींद्र साहेबराव पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्याच्या घराजवळ प्रवीण सुरेश चौधरी हा आला. त्याने गटारीचे सांडपाणी पास झाले आहे का? पाहुन घे असे सांगितले. गटारीच्या सांडपाण्याच्या कारणावरून प्रवीण चौधरी याने शिवीगाळ करत गच्ची धरुन खाली आदळले. प्रवीण चौधरीसह रवींद्र सुरेश चौधरी, सुरेश बाबुराव चौधरी, वैजंताबाई सुरेश चौधरी, वंदनाबाई रवींद्र चौधरी या पाच जणांनी मारहाण केली.
हे देखील वाचा :
- जळगाव शहरातील हॉटेलमध्येच सुरु होता कुंटणखाना; पोलिसांनी छापा टाकताच..
- तलाठी हल्ला प्रकरणातील आरोपींना 24 तासांच्या आत अटक; जिल्हाधिकारींनी दिले कडक कारवाईचे आदेश
- जळगाव शहरात अपघाताची मालिका सुरूच: भीषण अपघातात महिलेचा मृत्यू
- अॅड. प्रवीण चव्हाणांना ‘या’ अटी शर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर
- भरधाव कार झाडाला धडकली; रावेरचे तिघे तरुण जागीच ठार