⁠ 
रविवार, मे 19, 2024

एरंडोलत लोकसहभागातून नदी स्वच्छता चळवळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । एरंडोल नगर पालिकेतर्फे लोकसहभागातून अंजनी नदी स्वच्छता तसेच श्रमदानातून स्वच्छता व नदी काठावर वृक्ष लागवड मोहीम 23 जाने ( पराक्रम दिन) ते 26 जाने (प्रजासत्ताक दिन ) 2022 सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत चार दिवस आयोजित करण्यात आली आहे.

यासाठी शहरातील सर्व नागरीक, सर्व शासकीय कार्यालये, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बांधव, शिक्षक वृंद, सामाजिक मंडळ, तालीम मंडळे, सामाजिक कार्यकर्ते व एनजीओ यांना आवाहन करण्यात आले आहे.

तरी शहराच्या शाश्वत विकासासाठी आपल्याला शक्य असेल त्या प्रमाणात कोविड 19 अनुषंगिक नियमांचे पालन करून सहभाग नोंदवावा. श्रमदानासाठी शक्य असल्यास आवश्यक असलेले साहित्य सोबत घेऊन यावे, असे आवाहन
विकास नवाळे मुख्याधिकारी तथा प्रशासक एरंडोल नगर पालिका यांनी केले आहे.

हे देखील वाचा :