⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | पाच दिवसात चांदी ४ हजारांनी महागली, सोन्यात देखील वाढ, वाचा आजचा प्रति तोळा दर

पाच दिवसात चांदी ४ हजारांनी महागली, सोन्यात देखील वाढ, वाचा आजचा प्रति तोळा दर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२१ । काही दिवसांच्या नरमाईनंतर भारतीय सराफा बाजारात सोन्या (Gold Rate) चांदीच्या (Silver Rate) किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. आज जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याची किंमत स्थिर असल्याचे दिसून आलीय. तर दुसरीकडे मात्र, चांदीच्या दरात सलग चौथ्या दिवशी मोठी वाढ झाली आहे. आज चांदीच्या किंमतीत १००० रुपयाची वाढ झाली आहे. अशाप्रकारे चांदीचा भाव ६७ हजारांच्या उंबरवठ्यावर आला आहे. त्यापूर्वी गुरुवारी १० ग्रॅम सोन्याच्या भावात किंचित ४६० रुपयाची तर चांदीच्या १४१० रुपयाची वाढ झाली होती.

आजचा सोने आणि चांदीचा भाव?
आज शुक्रवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ४९,५१० इतका आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६६,९१० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

सध्या भारतात ओमिक्रॉनसह कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. तसेच कच्च्या तेलाचा भाव सात वर्षांच्या उच्चांकी पातळीवर गेल्याने महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. महागाईपासून बचाव करणाऱ्या सोने आणि चांदीला मात्र तेजीचे वलय निर्माण झाले आहे. जळगाव सराफ बाजारात आज सलग चौथ्या दिवशी चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदविली गेलीय.

गेल्या पाच दिवसात चांदीच्या दरात ४१८० रुपयांनी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे या आठवड्यात सोने देखील महागले आहे. गेल्या पाच दिवसात सोने चार वेळा महागले आहे. त्यात ६१० रुपयाने सोने महागले आहे. गेल्या आठवड्यात देखील सोने आणि चांदी महागली होती. त्यावेळी सोने जवळपास ३०० रुपयांनी तर चांदी १६०० रुपयांनी महागली आहे.

म्हणजेच गेल्या १५ दिवसांमध्ये चांदी तब्बल ५७०० रुपयांनी महागली आहे.

१७ जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,९०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,०५० रुपये असा होता. १८ जानेवारी (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०४० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,३५० रुपये इतका नोंदविला गेला. १९ जानेवारी (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,०५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६४,५०० रुपये इतका नोंदविला गेला. २० जानेवारी (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,५१० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६५,९१० रुपये इतका नोंदविला गेला

सोन्याची शुद्धता कशी तपासायची
24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिले आहे.
22 कॅरेटच्या दागिन्यांवर 916 लिहिले आहे.

  • 21 कॅरेट सोन्याच्या ओळखीवर 875 लिहिले जाईल.
    18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 लिहिले आहे.
  • 14 कॅरेटच्या दागिन्यांवर 585 लिहिले आहे.

अशा प्रकारे घरी बसून जाणून घ्या सोन्या-चांदीची किंमत
तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही एकदा किंमत तपासून पाहणे महत्त्वाचे आहे. दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर 8955664433 वर मिस कॉल करावा लागेल. यानंतर तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीनतम दर पाहू शकता.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.