जळगाव लाईव्ह न्यूज | २० जानेवारी २०२२ | गेल्या काही वर्षात सोशल मीडिया (Social media) वापराच्या बाबतीत तरुणाईचा कल प्रचंड वाढला आहे. त्यामुळे जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात बसून कुणाशीही संवाद साधणं अगदी सोपं झालं आहे. अशात सोशल मीडियावरून होणाऱ्या फसवणुकीचं प्रमाण देखील वाढलं आहे. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यात घडलीय.
रावेर तालुक्यातील एका मैत्रीणीचे लग्न मोडावे यासाठी तिच्याच अज्ञात व्यक्तीने मित्रासोबत असलेले फोटो सोशल मीडियावर टाकून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, जिल्ह्यातील एका गावात १९ वर्षीय तरुणी वास्तव्यास आहे. ती शिक्षण घेत असून तिचे लग्न जुळले आहे. तरुणीचे लग्न तुटावे या कारणाने इन्टाग्रामवर विशूनेमाने हे खाते असलेल्या व्यक्तीने तरुणीचे तिच्या मित्रासोबत फोटो इन्स्टाग्रामवरुन टाकले.
तसेच तरुणीचे लग्न जुळलेल्या तिच्या भावी पतीलाही संबंधित फोटो पाठवून तिची बदनामी केली, अशी तक्रार तरुणीने जळगाव सायबर पोलिसात दिली असून त्यावरुन विशूनेमाने हे खाते असलेल्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.
हे देखील वाचा :
- गोदावरी अभियांत्रिकीत स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन उत्साहात
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- रेल्वेत 10वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 4000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती, इतका पगार मिळेल?