जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२२ । एकीकडे थंडीचा जोर वाढलेला असतानाच राज्यात पुन्हा एकदा हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील २२ जानेवारीला पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तसेच पुढील काही दिवस खान्देश, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दाट धुक्यासह गारठा कायम राहणार आहे
राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. येत्या विकेंडला कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकेंडला फिरायला जाण्याचा प्लॅन करणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हवामान खात्याने शनिवारी 22 जानेवारी रोजी मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, रायगड आणि रत्नागिरी या अकरा जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. याठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून विकेंडला हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहेत.
तर 23 जानेवारी रोजी हवामान खात्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. या दोन जिल्ह्यात रविवारी तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर पुढील काही दिवस खान्देश, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दाट धुक्यासह गारठा कायम राहणार आहे. त्यानंतर 21 आणि 22 जानेवारी रोजी संबंधित विभागात तुरळक ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा :
- महाराष्ट्र्रात पुन्हा महायुतीचे सरकार; ‘या’ 5 मुद्द्यांमुळे मिळाला विजय..
- जळगाव जिल्ह्यात मविआला धोबीपछाड! सर्वच ११ जागांवर महायुतीचा विजय निश्चित
- महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार? मविआ सर्वात मोठा धक्का, आताची आकडेवारी वाचा
- LIVE : मतमोजणी सुरू : विधानसभा २०२४ निकाल
- धडधड वाढली! पोस्टल मतमोजणी सुरु