जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२२ । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे प्राजक्ता अजय बारी (बुंधे) या २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी सकाळी उघडकीस आलीय. दरम्यान, पैशासाठी सासरच्या लोकांनी प्राजक्ताला शारीरीक व मानसिक त्रास दिल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना?
शिरसोली येथील अजय अशोक बारी (बुंधे) वय ३० याच्यासोबत शेंदुर्णी येथील माहेर असलेल्या प्राजक्ता हिचा ११ महिन्यापूर्वी लग्न झालं होत. अजय बारी हा तेलंगणा राज्यात मनचगुरु येथे अँब्युलस चालक म्हणून शासकीय नोकरी करतो. दोन दिवसांपुर्वी तो गावी शिरसोलीत आला होता. आज दि. १९ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास शिरसोली येथे रहात्या घरात वरच्या मजल्यावर प्राजक्ता बारी ही गळफास घेतल्या अवस्थेत आढळून आली.

शेदुर्णी येथील प्राजक्ताच्या माहेरच्या लोकांनी ही आत्महत्या नसून खून केल्याचा आरोप सासरच्या लोकांवर केला आहे. प्राजक्ताला वेळोवेळी शिवीगाळ व अपमान करुन लग्नात हुंडा न दिल्याने त्यांनी लग्नानंतर वेळोवेळी ०२ लाखाची मागणी करुन प्राजक्ता हीस शारीरीक व मानसिक त्रास दिल्याने मुलीने गळफास घेवून आत्महत्या केली असून सदरचा मृत्यु सासरच्या लोकांनीच घडवुन आणला आहे, असा आरोप प्राजक्ताच्या माहेरच्या लोकांनी केला.
त्यांच्या तक्रारीवरून अजय अशोक बुंधे (पती), अशोक दगडू बुंधे (सासरा), शोभाबाई अशोक बुंधे (सासु), विजय ऊर्फ सोनु अशोक बुंधे (जेट), वैशाली अशोक काळे रा.शिरसोली प्रणे (ननंद) सर्व रा. शिरसोली प्रण ता.जि. जळगाव यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा :
- जळगाव शहर पोलिसांची चोरीच्या गुन्ह्याचा छडा; तीन आरोपी अटकेत, १० हजारांची रोकड जप्त
- त्या कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे ; आसोदा पुलावरून मंत्री गुलाबराव पाटील कडाडले
- निराधार व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
- मुक्ताईनगरातील ट्रॅव्हल्समधील डिझेल चोरीचा उलगडा, भिवंडीतील दोन आरोपी जेरबंद
- शालार्थ आयडी घोटाळा ! एका ‘फोन कॉल’ने डिस्चार्ज रद्द करून संजय गरुड पुन्हा रुग्णालयात; राजकीय हस्तक्षेपाची चर्चा











