गुन्हेरावेर

1 लाख 15 हजाराची लाच मागणाऱ्या वन परिक्षेत्रीय अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२२ । शासकीय कंत्राटदाराने विविध कामे केल्यानंतर निघणार्‍या बिलातून पाच टक्के प्रमाणे एक लाख 15 हजाराची लाच मागणाऱ्या रावेर वन परीक्षेत्रीय अधिकाऱ्याविरुद्ध आज मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकेश हरी महाजन (45, रा.वन विभागाचे शासकीय निवासस्थान, रावेर) लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?
औरंगाबाद शहरातील 53 वर्षीय शासकीय कंत्राटदार यांनी रावेर तालुक्यात ए.एन.आर रोपवन अंतर्गत चेनसिंग फेनसिंग व गेटचे काम हे ऑनलाईन ई-निवेदेव्दारे मिळवले होते. त्यात पाल कंपार्टमेंट क्रमांक 55, लोहारा कंपार्टमेंट क्रमांक 24 तसेच जिन्सी कंपार्टमेंट क्रमांक नऊ ही कामे त्यांना मिळाल्यानंतर पालचे काम पूर्ण झाल्याने 26 लाखांचा धनादेश त्यांना मिळाला मात्र लोहारा येथे काम पूर्ण होवूनही धनादेश मिळाला नसल्याने पाल व लोहारा या दोन्ही कामांचे पाच टक्क्यांप्रमाणे पैसे द्यावे लागतील शिवाय पाल येथील कामाचा धनादेश यापूर्वीच दिल्याने त्यापोटी पाच टक्के लाच म्हणून एक लाख 30 हजारांची मागणी करण्यात आली मात्र एक लाख 15 हजार रुपये देण्यावर तडजोड करण्यात आली.

शासकीय कंत्राटदाराने एक लाख 15 हजारांची लाच मागणी संशयीत मुकेश महाजन यांनी केल्यानंतर तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली होती व त्यानुसार पथकाने सापळारदेखील रचला मात्र आरोपी मुकेश महाजन यांना ट्रॅपचा संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नव्हती व त्यानंतर ते रजेवर निघून गेल्याचे सांगण्यात आले.

रावेर पोलिसात अखेर गुन्हा
लाच मागणी प्रकरणी मंगळवार, 18 जानेवारी रोजी रावेर वन परीक्षेत्रीय अधिकारी मुकेश हरी महाजन (45, रा.वन विभागाचे शासकीय निवासस्थान, रावेर) यांच्याविरोधात एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. संशयीतास अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नाशिक एसीबीचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश डी.भामरे (वाचक) यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत श्रीराम पाटील यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, पोलिस नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने केली.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button