जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२२ । कर्जाच्या विवंचनेतून विष प्राशन करून एका ४९ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना जळगाव तालुक्यातील विटनेर येथे घडलीय. गोकुळ पांडुरंग वराडे (वय ४९) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

याबाबत असे की, मकर संक्रातीच्या दिवशी गोकुळ वराडे हे शेतात फवारणीसाठी गेले होते. यादरम्यान त्यांनी विषारी द्रव्य सेवन केले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटूंबाने त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना रविवारी रात्री ११ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, वराडे यांनी जळके स्टेट बँक शाखेतून शेतासाठी कर्ज घेतले आहे. त्यांच्याकडे स्वतः च्या मालकीचे विटनेर शिवारात एकूण ८० आर जमीनीचे क्षेत्र आहे. कर्जाच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस प्रदिप पाटील करीत आहेत.
हे देखील वाचा :
- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणेशोत्सव स्पर्धांतून संस्कृतीचा जागर
- सराफा बाजारात शनिवारी मोठी तेजी! सोने-चांदीत तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ?
- जळगाव रेल्वे स्थानकावरील कामाचा फटका; १२ गाड्या रद्द, अनेकांच्या वेळेत बदल
- मुंबईत लालबागच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या तरुण अभियंत्याचा मृत्यू
- बांभोरी पुलावरून महिलेने घेतली गिरणा नदीत उडी; शोधमोहीम सुरू !










