जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२१ । बोदवड नगरपंचायत निवडणूक (Bodwad Nagar Panchayat Election) चांगलीच गाजणार आहेत. कारण मतदान तोंडावर आलेलं असतानाच बोदवड येथे भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन व मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची बंद दाराआड बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसेंना(Ekanth Khadse) शह देण्यासाठी भाजप आणि शिवसेनामध्ये छुपी युती झाली असावी अशी चर्चा सुरु असल्याने अख्या जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केली. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असली तरी स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी ‘कोण नाय कोन्चा’ असंच राजकीय चित्र आहे. याचीच प्रचिती म्हणजे बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्यानिमित्तानं येत आहे.
कारण एकनाथ खडसे यांना टक्कर देण्यासाठी गिरीश महाजन व शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील एकत्र आल्याची चर्चा आहे. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड खलबतं झाली आहेत. बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात चार जागांसाठी उद्या मतदान होत आहे. तर, १९ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीत एकनाथ खडसे व गिरीश महाजन पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकले आहेत. प्रचाराच्या दरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीकेच्या तोफा डागल्या होत्या. त्याचबरोबर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
दरम्यान, महाजन यांच्या सोबत झालेल्या बैठकीबद्दल चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘उमेदवारांच्या प्रचारासाठी गेलो असताना एका प्रभागात गिरीश महाजन यांची भेट झाली. त्यावेळी आमच्यात औपचारिक चर्चा झाली. या भेटीचा कुठलाही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. जे लोक तसं करत असतील त्यांच्या बुद्धीचं दिवाळं निघालं आहे.’
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत ‘भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन
- मुक्ताईनगरमध्ये लागणार धक्कादायक निकाल; संभाव्य आमदार कोण? पाहा..
- उमेदवारांनो मुंबई गाठा! निकलाआधी शरद पवारांच्या महत्त्वाच्या सूचना, वाचा काय आहेत?
- चाळीसगाव मतदारसंघात कोणता आमदार निवडून येणार? पाहा exit Poll