जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२२ । पाडळसरे येथून जवळच असलेल्या पाडसे येथे पोलिसांना फोन करून यात्रा बंद केल्याच्या संशयावरून महिला सरपंचांचा विनयभंग केल्याप्रकरणी दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पाडसे येथील महिला सरपंचांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार १४ रोजी रात्री ८.३० वाजता त्या घरी असताना पोलिसांना फोन करून गावातील यात्रा बंद केल्याच्या कारणावरून गावातील नीलेश पांडुरंग पाटील, रामकृष्ण भगवान कोळी या दोघांनी घरात घुसून त्यांना घराबाहेर ओढून घेवून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले अाहे.

तसेच सरपंच व त्यांच्या पतीला शिवीगाळ करुन दम दिल्याप्रकरणी मारवड पोलिसांत नीलेश पाटील व रामकृष्ण पाटील यांच्या विरोधात विनयभंग व दमदाटी करणे आदी कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार बाळकृष्ण शिंदे करत आहेत.दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हे देखील वाचा :
- बांभोरी पुलावरून महिलेने घेतली गिरणा नदीत उडी; शोधमोहीम सुरू !
- गिरणा नदीपात्रात धडक कारवाई ; २९ वाहने ताब्यात, ३.६० कोटींचा मुद्देमाल ताब्यात
- चाळीसगावात गुटखा तस्करीचा पर्दाफाश; दोघे ताब्यात, 16.91 लाखांचा मुद्देमाल जप्त
- पाचोऱ्यातील फूल विक्रेत्याला लावला तब्बल २३ लाखांचा गंडा ; अशी झाली फसवणूक?
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू










