गुन्हेजळगाव जिल्हा

पहूर येथे दोन गटात हाणामारी; १० जणांविरोधात गुन्हा, सात अटकेत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । पहूर येथील बसस्थानकाजवळ लक्झरी बस आणि ओमनी कारच्या अवैध वाहतुकीच्या कारणावरुन, दोन गटात हणामारी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. यावेळी पोलिसांनाही धक्काबुक्क़ी झाली. या प्रकरणी दोन्ही गटातील दहा जणांविरूद्ध दंगल व शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला. तर सातही जणांना अटक करण्यात आली आहे.

गुरुवारी सकाळी बसस्थानकाजवळ खासगी अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांमध्ये शाब्दीक वाद झाले. यानंतर दोन गटातील तरुण समोरासमोर आल्याने तुफान हनामारी झाली. यावेळी बसस्थानक परिसरात बंदोबस्तासाठी तैनात पोलिस कर्मचाऱ्यांनी शांततेचे आवाहन केले. मात्र, संशयितांनी पोलिसांना धक्काबुक्की झाली. दोन्ही गटातून परस्पर तक्रार नसल्याने पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर ढाकरे यांच्या फिर्यादीवरुन तौफीक शब्बीर शेख (रा.अजिंठा), अल्ताफ रऊफ शेख, कलीम रऊफ शेख, अकबर रऊफ शेख़, फजल सईद शेख, गोलू रऊफ शेख़, चेतन सुधाकर पाटील, सचिन सुधाकर पाटील, किशोर समाधान पाटील (सर्व रा. पहूरपेठ), चेतन गुलाब बैरागी(रा.कासमपुरा, ता.पाचोरा) या दहा जणांवर गुन्हा दाखल झाला.

जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी केला लाठीचार्ज

पोलिस निरीक्षक अरुण धनवडे व सहकारी येताच जमाव पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला. डीवायएसपी भारत काकडे यांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button