⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

जळगावची ए. टी. झांबरे गणिताचे कृतियुक्त शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा!

जळगाव लाईव्ह न्यूज| २१ ऑगस्ट २०२३| गणिताचे शिक्षण प्रात्यक्षिक स्वरुपात देण्याचा अनोखा प्रयत्न जळगावातील ए. टी. झांबरे शाळेने सुरू केला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि एनसीएफ 2005 नुसार कृतियुक्त अध्ययन पद्धती राबविण्यासाठी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

कागद, पुठ्ठा, वस्तूंच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणिताच्या सोप्या ट्रिक दिल्या जात आहे. गेल्या वर्षी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आल्याने गणिताचा शंभर टक्के निकाल जाहीर झाला. गणिताची कृतीयुक्त शिक्षण देणारी जळगावातील ही शाळा राज्यात प्रथम आहे.

विद्यार्थ्यांना पुस्तकांत व अपेक्षा प्रात्यक्षिकाद्वारे शिकवलेले लवकर समजते. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात देखील कृतीयुक्त अध्ययन पद्धतीवर भर देण्याबाबत सांगण्यात आले आहे. यासाठी शाळांनी वेगवेगळे उपक्रम राबवण्याचे आव्हान केले आहे.
याच पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील येथे ए. टी. झांबरे शाळेने पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणिताचे प्रात्यक्षिक राबवण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. प्रत्येक इयत्तेच्या एका प्रकरणासाठी दोन आराखडे तयार केले आहेत. हे आराखडे इतर शाळांनाही मार्गदर्शक ठरतील. विद्यार्थ्यांना गणित विषयाची आता भीती राहणार नाही.

यंदापासून पाचवीसाठी देखील हा उपक्रम करण्यात आल्याचे मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी सांगितले आहे. गणिताचे शिक्षक महेंद्र नेमाडे यांच्या संकल्पनेतून गणित मंडळांनी आराखडा तयार केला आहे. गेल्या वर्षीही राबवलेल्या पायलट प्रोजेक्ट मध्ये नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनाही पुस्तके देण्यात आली होती. याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. विद्यार्थ्यांना गणिताची गोडी निर्माण झाली तसेच प्रयोगातून गणेश शिकल्याने त्यांना ते लवकर लक्षात राहिले. परिणामी या दोन्ही वर्गांचे निकाल हे शंभर टक्के जाहीर झाले आहे.

या उपक्रमाचे सर्व आराखडे या शाळेतील शिक्षक महेंद्र नेमाडे, एन. बी. पालवे, पी. आर. कोल्हे, आर. आर. पाटील, एम. वाय. ठोसरे, बिपिन झोपे आणि पराग राने यांनी मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले आहे. विद्यार्थ्यांच्या मनात असणारी गणिताची भीती दूर करणे व गणिताची मुलांची मैत्री करणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे