जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोरा | गिरणा नदीला अतिक्रमण, प्रदूषण आणि शोषणापासून वाचविणे साठी तसेच गिरणा नदीवर तयार होणारे प्रस्तावित सात बलून बंधाऱ्यांच्या मंजुरीसाठी खासदार उन्मेश पाटील यांनी आयोजीत केलेल्या गिरणा पुनरुज्जीवन अभियानाअंतर्गत नदी परिक्रमेचा तिसरा टप्प्यास येत्या १५ जानेवारी शनिवार पासून सुरू होत असून ३८० किलोमीटर गिरणा परिक्रमेचा तिसऱ्या टप्प्यात खासदार उन्मेश पाटील हे दहिगाव संत, डोकलखेडा, वरसाडे, माहेजी, कुरंगी, दुसखेडा बहुळेश्वर संगम, परधाडे गणपती मंदिर असा २४ किमी पायी चालत गिरणा काठाचा प्रवास करणार असुन ठिकठिकाणी गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सर्वपक्षिय लोकचळवळ ठरत असलेल्या नदी परिक्रमेत सहभागी व्हावे असे आवाहन अमोल शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे.
खासदार उन्मेश पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित गिरणा नदीच्या शाश्वत विकासासाठी दि. 1 जानेवारी रोजी कण्व आश्रम कानळदा ता. जि. जळगाव येथून गिरणा परिक्रमेला सुरुवात करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात 18 किलोमीटर तर सावखेडा शिवारातील गिरणा नदी पात्राजवळ असलेल्या जलाराम बाबा मंदिरापासून परिक्रमेच्या ३२ किलोमीटर दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली होती.
येत्या शनिवारी तिसरा टप्प्याचा परिक्रमेचा प्रवास पाचोरा तालुक्यातील दहीगाव संत येथील परमपूज्य बाबुराव महाराज यांचे आश्रमापासून परिक्रमेला सुरुवात होणार आहे. ही परिक्रमा सकाळी ०८:०० वाजता दहिगाव संत, ०९:०० वाजता डोकलखेडा, १०:३० वाजता वरसाडे, दुपारी १२:०० वाजता माहेजी, ०२:०० वाजता कुरंगी, ०५:०० वाजता दुसखेडा व सायंकाळी ०६:०० वाजता परधाडे येथे पोहोचणार असून येथे परिक्रमेचा तिसरा टप्पाचा समारोप होणार आहे. अशी माहिती अमोल शिंदे यांनी दिली आहे.
नदी परिक्रमेला लोकचळवळीचे आले स्वरूप
गिरणा नदीचा प्रश्न, कावेरी कॉलिंग प्रमाणे देश पातळीवर गिरणा सात बलून बंधाऱ्यांचा प्रश्न पोहोचण्याचा प्रयत्न या परिक्रमेत द्वारे केला जाणार असून गिरणा नदी परिक्रमेचे गावोगावी उत्सुर्त स्वागत होते आहे. गेल्या शनिवारी जळगाव शहर, सावखेडा ,कांताई बंधारा, दापोरा, धानोरा, लमांजन, म्हसावद सुमारे ३२ कि.मी.प्रवास करीत म्हसावद पोहचली होती.येथे ग्रामपंचायतीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले होते. प्रत्येकठिकाणी परिसरात गावकऱ्यांच्या सहभागाने परिक्रमेला लोकचळवळीचे आले स्वरूप प्राप्त झाले आहे.परिक्रमेतून बलून बंधाऱ्याची लोकजागृती होत असुन ३८० किलोमीटर गिरणा परिक्रमेचा दुसरा टप्पात खासदार उन्मेश पाटील यांनी ३२ किमी पायी चालत केला गिरणा काठाचा प्रवास करीत गिरणा पुनरुज्जीवन अभियानातून गिरणेला गतवैभव प्राप्त करून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे. अशी माहिती देखील अमोल शिंदे यांनी यावेळी दिली आहे. या परिक्रमेच्या मार्गावर बॅनर, एलईडी व्हॅन, पत्रके वाटून सहभागीहोण्याचेआवाहनकरण्यातआलेअसून विवीध सर्वपक्षिय पदाधिकारी व पर्यावरणावर काम करणाऱ्या विविध संघटनांचे पदाधिकारी, गिरणा पुनरूज्जीवन अभियान प्रेमी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.