⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | पाचोऱ्यात प्रांताधिकारी निवासस्थानाचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

पाचोऱ्यात प्रांताधिकारी निवासस्थानाचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२२ । पाचोरा उपविभागीय अधिकारी यांच्यासाठी हक्काचा निवारा असावा या भावनेतून आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्यामूळे तथा तत्कालीन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या कार्यकाळात सूरु झालेल्या प्रांताधिकारी निवासाच्या प्रवासाची फलनिष्पत्ती झाली. असून सुमारे ५९ लक्ष रुपये खर्चाचे भडगाव रोड वरील शासकीय विश्राम गृहाच्या परिसरात होणाऱ्या शासकीय निवास्थानाचे भूमिपूजन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, बांधकाम विभागाचे अभियंता उपअभियंता शेलार, ज्युनियर अभियंता काजवे यांची उपस्थिती होती. यावेळी खुशाल जोशी यांनी विधिवत पूजा करत कार्यक्रम संपन्न केला.
शासकीय अधिकारी कर्तव्यावर असतांना त्यांना घरी आल्यावर हक्काचे निवासस्थान असावे अशी अनेक वर्षांपासून मागणी होत होती.त्याची दखल घेत आ.किशोर अप्पा पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे या मागणीचा पाठपुरावा केला होता.

या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष गंगाराम पाटील, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे,शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर, नंदू पाटील, प्रवीण पाटील स्वीय सहाय्यक राजेश पाटील, शरद तावडे, अमोल पाटील, राजू पाटील, प्रवीण ब्राह्मणे,सुमीत सावंत, आबा कुमावत, जितू पेंढारकर, एकनाथ पाटील यांची उपस्थिती होती.

यांच्यासाठीही निवारा

पाचोऱ्यात तहसीलदार, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, अभियंते, पोलीस बांधव यांच्यासाठी देखील हक्काचा निवारा असावा तसेच प्रत्यक गावात तलाठी कार्यालय असावे यासाठी आपला पाठपुरावा सुरू असून लवकरच सर्व अधिकाऱ्यांच्या व पोलीस बांधवांच्या निवासस्थानाचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे. असे मत आ. किशोर पाटील यांनी व्यक्त केले.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह