जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२१ । दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येतेय. अशात एका सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. चोपडा तालुक्यातील आडगाव हा प्रकार घडला असून संशयित नराधम पसार झाला आहे. याबाबत चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, आडगाव येथील रहिवासी असलेल्या सहा वर्षीय बालिकेवर, संशयित बाबुलाल बारकू भिल याने १० रोजी आडगाव येथे लैंगिक अत्याचार केला. संशयित नराधम याने बालिकेला बोरे खाण्यासाठी माझ्यासोबत चल असे सांगून सोबत नेले. आडगाव येथील नाल्यामध्ये नेऊन हात बांधून संशयिताने तिच्यावर अत्याचार केला.

याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात कोकीळाबाई भिल यांच्या फिर्यादीवरून कलम ३५४, बालकांचे लैंगिक शोषण कलम ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करत आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत.
हे देखील वाचा :
- मुक्ताईनगरातील ट्रॅव्हल्समधील डिझेल चोरीचा उलगडा, भिवंडीतील दोन आरोपी जेरबंद
- शालार्थ आयडी घोटाळा ! एका ‘फोन कॉल’ने डिस्चार्ज रद्द करून संजय गरुड पुन्हा रुग्णालयात; राजकीय हस्तक्षेपाची चर्चा
- महाराष्ट्रात पाऊस घेणार ‘ब्रेक’; ‘या’ तारखेनंतरच जोरदार पुनरागमन; वाचा हवामान अंदाज..
- चाळीसगाव लैंगिक अत्याचार प्रकरण; आरोपीला 20 वर्षांचा सश्रम कारावास
- चोपडा हादरले! जन्मदात्या बापाचा दोन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर









