
जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२२ । शहरातील विविध विकासकामांच्या मंजुरीसाठी आयोजित मनपाच्या विशेष महासभेत भाजपकडून ४२ कोटींच्या कामाला विरोधाची शक्यता होती. दरम्यान, महासभेत भाजपने घुमजाव करीत ४२ कोटींच्या कामाला सहमती दर्शवल्याने तो विषय मंजूर करण्यात आला आहे.
महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या विशेष महासभेला मनपा सभागृहात सुरुवात झाली आहे. व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित आहेत.
जळगाव शहरातील विविध विकासकामांसाठी १०० कोटींचा विशेष निधी मंजूर झाला होता. १०० कोटींपैकी ४२ कोटींची कामे निश्चित झाली असून आज झालेल्या महासभेत तो विषय मांडण्यात आला. ४२ कोटींच्या कामात बऱ्याच नगरसेवकांची कामे घेण्यात आलेली नाही त्यामुळे उर्वरित ५८ कोटींच्या कामात भाजप नगरसेवकांना पूर्णपणे विश्वासात घेऊन त्यांची कामे समाविष्ट करून घ्यावी, अशा सूचना नगरसेविका ऍड.शुचिता हाडा यांनी मांडली. सर्वांना सोबत घेऊन सर्वांना समान निधी देण्याची आमची भूमीका आहे. आधी शहारातील रस्त्यांचा विषय महत्वाचा आहे. आता रद्द केलेली कामे पूढे घेण्यात यावी अशी मागणी नगरसेवक राजेंद्र घुगे यांनी मांडली.
भाजपने मंजुरी दिल्याने ४२ कोटींच्या कामातून शहरातील मुख्य रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
हे देखील वाचा :
- जळगावात ‘रोजगार महाकुंभ’; उद्या २३ ठिकाणी मेळावे, 1250 हून अधिक नोकऱ्यांची संधी
- सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला
- जळगावात ‘होमिओपॅथी सायंटिफिक केस स्टडीज’ पुस्तकाचे प्रकाशन
- ‘इंडस्ट्रियल अॅप्रोच इन इलेक्ट्रॉनिक्स’ कार्यशाळा उत्साहात
- जळगावात मंदिरातील दानपेटी चोरीचा पर्दाफाश; संशयितासह बालक ताब्यात





