⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | आजपासून भुसावळ विभागातून धावणाऱ्या १० रेल्वे गाड्या दोन दिवस रद्द

आजपासून भुसावळ विभागातून धावणाऱ्या १० रेल्वे गाड्या दोन दिवस रद्द

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण ठाणे आणि दिवा (Thane to Diva) दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी आज शनिवार व रविवारी (दि. ८ व ९) असा दोन दिवसाचा ब्लॉक (Block) घेण्यात आला आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या १० प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

या गाड्यांचे आधीच आरक्षण करून ठेवणाऱ्यांचे तिकीट आपोआप रद्द होईल. दाेन दिवस रद्द केलेल्या गाड्यांमध्ये गाडी क्रमांक १२११० मनमाड-मुंबई पंचवटी (८ व ९ जानेवारी), १२०७१ मुंबई-जालना (८ व ९ जानेवारी), १२०७२ जालना-मुंबई (८ व ९ जानेवारी), १२१०९ मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस (८ व ९ जानेवारी), १२१११ मुंबई-अमरावती एक्स्प्रेस आजपासून दोन दिवस १० रेल्वे गाड्या रद्द(८ व ९ जानेवारी), १२११२ अमरावती-मुंबई एक्स्प्रेस (७ व ९ जानेवारी), १७६११ नांदेड-मुंबई राज्य राणी एक्स्प्रेस (७ व ८ जानेवारी), १७६१२ मुंबई-नांदेड राज्य राणी एक्स्प्रेस (८ व ९ जानेवारी), १२१४० नागपूर-मुंबई सेवा ग्राम एक्स्प्रेस (७ व ८ जानेवारी), १२१३९ मुंबई-नागपूर सेवा ग्राम (८ व ९ जानेवारी) रद्द केली आहे.

पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली. असे असले तरी ऐनवेळी गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागणार आहे. यापूर्वी, गेल्या आठवड्यात देखील येथील कामासाठी रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतला हाेता.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.