जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२१ । धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत तरुणाने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी रात्री घडली. अमोल छगन सपकाळे (वय-३१ , रा. आव्हाणे ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून याप्रकरणी जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, आव्हाणे येथील अमोल सपकाळे हा भाऊ रविंद्र आणि आई विजूबाई यांच्यासह वास्तव्याला आहे. हातमजूरी आणि वाहनचालकाचे काम करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी रात्री ९ वाजता आईला गावाला जावून येतो असे सांगून घराबाहेर निघाला. गावाला न जाता आव्हाणे शिवारातील रेल्वे खंबा क्रमांक ३००/ ३७ ते ३२६ या दरम्यान धावत्या रेल्वेखाली अमोलने आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही.

जळगाव स्टेशनमास्तर यांच्या खबरीवरून तालुका पोलीसात नोंद करण्यात आली. तालुका पोलीस ठाण्याचे पोनि रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुशील पाटील आणि दिपक कोळी यांनी रात्री उशीरा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणला. शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला . पुढील तपास सुशील पाटील व दिपक कोळी करीत आहे.
हे देखील वाचा :
- बांभोरी पुलावरून महिलेने घेतली गिरणा नदीत उडी; शोधमोहीम सुरू !
- गिरणा नदीपात्रात धडक कारवाई ; २९ वाहने ताब्यात, ३.६० कोटींचा मुद्देमाल ताब्यात
- चाळीसगावात गुटखा तस्करीचा पर्दाफाश; दोघे ताब्यात, 16.91 लाखांचा मुद्देमाल जप्त
- पाचोऱ्यातील फूल विक्रेत्याला लावला तब्बल २३ लाखांचा गंडा ; अशी झाली फसवणूक?
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू










