जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२१ । भुसावळचे आमदार संजय सावकारे यांची कार परिवहनमंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे परिवहन विभागानेही चौकशी सुरू केली आहे. गुरुवारी मुंबईच्या दक्षता समितीमधील सहायक परिवहन आयुक्त दिनकर मनवर व राजेंद्र मदने या दोघांनी जळगावात येऊन आरटीओ कार्यालयात झाडाझडती केली. प्राथमिक चौकशी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामात हलगर्जीपणा केल्याचे आढळून आले आहे.
या प्रक्रियेत खोटेनगरात राहणाऱ्या अशोक पाटील यांच्या मोबाइलचा वापर झाला आहे. पाटील यांनी आरटीओ एजंट पप्पू भोळे यांनी हा मोबाइल वापरल्याचा दावा केला आहे. खुद्द परिवहनमंत्री परब यांच्या नावावर कार केलेली असल्यामुळे राज्यपातळीवर खळबळ उडाली आहे. त्या अनुषंगाने परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्या आदेशाने गुरुवारी दोन अधिकारी जळगावात दाखल झाले. त्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्या दालनातील संगणक व फायलींची तपासणी केली. त्यानंतर प्रत्येक टेबलावर जाऊन कामाची पद्धत जाणून घेतली.
मुक्ताईनगरातील सीमा नाक्यांवरही होणार चौकशी
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरच्या सीमा नाक्यांवर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याची तक्रार केली आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी दक्षता समितीचे एक पथक कर्की नाक्यावर तपासणीसाठी येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
हे देखील वाचा :
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- Pachora : वाळू माफियांकडून महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघांना अटक
- धक्कादायक ! अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, रुग्णालयात दाखल