⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 26, 2024
Home | गुन्हे | Amalner : पोलीस कोठडीतील संशयिताने घेतला गळफास, पोलीस ठाण्यात एकच खळबळ

Amalner : पोलीस कोठडीतील संशयिताने घेतला गळफास, पोलीस ठाण्यात एकच खळबळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२४ । अमळनेर पोलीस स्थानकाच्या कोठडीत असलेल्या एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दि ९ माची रोजी सकाळी उघडकीस आली. घनश्याम भाऊलाल कुमावत (वय ४९ रा.डांगरी प्र.ता.अमळनेर) असं आत्महत्या केलेल्या कैद्याचं नाव असून पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्यासह इतर अधिकारी त्याठिकाणी पोहचले आहेत.

नेमका प्रकार काय आहे?
अमळनेर तालुक्यातील तालुक्यातील मारवड पोलीस स्थानकाच्या अंतर्गत झालेल्या चोरीच्या प्रकरणी घनश्याम कुमावत या संशयिताला २ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत दि.६ मार्च रोजी संपल्याने त्यास मारवड पोलीस स्टेशन येथील दि.२९ फेब्रुवारी २०२४ रोजी दाखल गुन्ह्यात पोलीस कोठडी घेऊन वर्ग केले होते.

मात्र, पोलीस कोठडीत असताना शनिवार दि.९ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास पोलीस लॉकअप अमळनेर मधील शौचालयात संशयीत आरोपी घनश्याम भाऊलाल कुमावत याने गळफास घेतला. काही वेळातच ही माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ त्याला रूग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे त्याला मृत घोषीत करण्यात आले. संबंधीत व्यक्तीने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला? याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी या घटनेने पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली दरम्यान, अमळनेर येथे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.