⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

Breaking : जळगावातील डॉक्टरवर हनी ट्रॅप, व्हिडीओ तयार करून मागितली खंडणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२२ । राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी हनी ट्रॅपचे प्रकार उघड झाले आहे. जळगावात देखील एका डॉक्टरला हनी ट्रॅपमध्ये अडकवत त्याच्याकडून ७ लाखांची खंडणी मागण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात ४ महिला व ३ तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील रामानंद नगरात राहणारे डॉक्टर एका हॉस्पिटलमध्ये सेवा बजावतात. दि.१५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान काही तरुण तरुणींनी त्यांना अडकविण्याच्या उद्देशाने कट तयार केला.

एका तरुणीने डॉक्टरांना शरीरसुखाची ऑफर देत त्याचे मोबाईलमध्ये शूटिंग केले. इतर तरुणांनी डॉक्टरांना मारहाण करीत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ७ लाखांची खंडणी मागितली. पैसे दिले नाही तर व्हिडीओ समाजात व्हायरल करीत जिवनातून उठवून टाकण्याची धमकी दिली.

डॉक्टर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर करीत आहेत.