⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | मु.जे.महाविद्यालयात पत्रकारिता दिन उत्साहात

मु.जे.महाविद्यालयात पत्रकारिता दिन उत्साहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२२ । बातमीतील घटना, घटना घडण्यामागे असलेले राजकीय, सामाजिक तसेच आर्थिक प्रवाह व शक्ती आणि घटनांचे संभाव्य परिणाम यांचे विश्लेषण करणे, वाचकांना सुजाण करणे, घटनांबद्दलची मर्मदृष्टी देणे आणि त्यांना आपले मत बनविण्यासाठी सहाय्य करणे या गोष्टींचाही अंतर्भाव पत्रकारितेत दिसतो. काळ जसा बदलत आहे तसे माध्यम सक्षम होताना दिसत आहेत असे प्राचार्य अशोक राणे यांनी विचार मांडले.

मू.जे.महाविद्यालयातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिन शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षणशास्त्र आणि शारीरिकशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अशोक राणे, योगेश शुक्ल ( कला विभागप्रमुख ,मृदंग इंडिया असोसिएट ) व प्रा.संदीप केदार (विभागप्रमुख, जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग) यांनी प्रतिमापूजन केले.

यावेळी प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या विषयी माहिती देत पत्रकारितेत होत असलेले बदल आव्हानात्मक असून यात विद्यार्थ्यांना करिअरची मोठी संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमास जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.संदीप केदार, फोटोग्राफर संजय जुमनाके, प्रा.केतकी सोनार उपस्थित होते.

दुसऱ्या सत्रात योगेश शुक्ला यांनी एक दिवशीय पेजीनेशन कार्यशाळेत वृत्तपत्रातील बदलते तांत्रिक बदल, खिळे टंक छपाई ते डीजीटल छपाई प्रवास त्यांनी सांगितला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विठ्ठल भालेराव याने केले तर प्रस्तावना व आभार प्रा.संदीप केदार यांनी केले.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.