जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२१ । कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन प्रकाराशी झुंज देत असलेल्या जगासाठी आणखी एक वाईट बातमी आहे. फ्रान्समधील शास्त्रज्ञांना कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार सापडला आहे जो Omicron पेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉनपेक्षाही अधिक वेगानं हा नवा वेरिएंट म्युयेट होत असल्याचं अभ्यासातून समोर आलंय. त्यामुळे चिंतेत आणखीनच भर पडली आहे.
कोरोनाच्या या नव्या आणि जास्त संसर्गजन्य असलेल्या या वेरीएंटचं नाव आहे. IHU (B.1.640.2). फ्रान्समधील आयएचयू मेडिटेरनी इन्फेक्शन इन्स्टिट्यूनं केलेल्या अभ्यासात या अधिक गंभीर आणि वेगानं पसरणाऱ्या नव्या वेरीएंटचा शोध लावला आहे. ओमिक्रॉनच्या तुलनेत हा नवा वेरीएंट तब्बल 46 पट जास्त संसर्गजन्स आहे. ओमिक्रॉन वेरीएंटपेक्षा नव्या वेरीएंटमध्ये 46+ म्युटेशन्स असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.
किती जणांना लागण?
आफ्रिकेतील कॅमेरुन येथून प्रवास करुन फ्रान्समध्येल आलेल्याला या नव्या IHU वेरीएंटची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत फ्रान्समध्ये 12 जणांना या नव्या विषाणूची बाधा झाली आहे. सध्या ओमिक्रॉनमुळे संपूर्ण देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे ढग अधिक गडद होत असतानाच आता फ्रान्समध्ये आणखी एका नव्या वेरीएंटच्या शोधानं सगळेच धास्तावले आहे.
हे देखील वाचा :
- जळगावकरांचे प्रचंड आभारी आहे; “हॅट्ट्रिक” साधून विजयी झाल्यानंतर आ. राजूमामांची प्रतिक्रिया
- जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटीलांचा पुन्हा विजय ; विरोधकांना चारली धूळ
- जळगाव शहरातून राजूमामा भोळे यांची विजयी हॅट्रिक
- महाराष्ट्र्रात पुन्हा महायुतीचे सरकार; ‘या’ 5 मुद्द्यांमुळे मिळाला विजय..
- जळगाव जिल्ह्यात मविआला धोबीपछाड! सर्वच ११ जागांवर महायुतीचा विजय निश्चित