शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई बँक खात्यात जमा करा : जिल्हा काँग्रेस सेवा फॉउंडेशन
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । यावल येथे मागील काही महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. त्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई तसेच पिकविम्याची रक्कम अद्याप जमा झाली. नसून सदर रक्कम येत्या 8 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी.अन्यथा येथील तहसील कार्यालयासमोर दि.10 सोमवार रोजी पासून आमरण उपोषण सुरू करू, असे निवेदन जळगाव जिल्हा काँग्रेस सेवा फॉउंडेशनच्या वतीने नायब तहसीलदार पाटील यांना देण्यात आले. तसेच आपण शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडचणी शासनपर्यंत आपल्या मार्फत पाठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे सांगण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने सरपंच परिचदेचे तालुकाध्यक्ष तथा वढोदे गावचे सरपंच युवानेते संदीप सोनवणे, शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरुड, दहिगावचे सरपंच अजय अडकमोल, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, महेलखेडी सरपंच शरिफाताई तडवी, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदिर खान, काँग्रेस सेवा फॉडेशनचे शहराध्यक्ष नईमभाई शेख, काँग्रेस सेवा फौंडेशनचे रावेर लोकसभा अध्यक्ष सद्दाम सेठ शाह,काँग्रेस सेवा फॉडेशनचे जिल्हा सरचिटणीस भूषण निंबायत, दहिगावचे माजी सरपंच सत्तार तडवी, कोरपावलीचे उपसरपंच प्रतिनिधी मुक्तार पटेल, कोरपावलीचे ग्राप.सदस्य आरिफ तडवी, सिकंदर तडवी, वाढोदे गावचे उपसरपंच गोपाळ चौधरी, नानाभाऊ सोनवणे, चेतन सोनवणे, रहेमान खाटीक, अनिल जंजाळे, अनिलभाऊ कोळी, आत्माराम महाजन, निसार भाई शेख, काँग्रेस सेवा फॉडेशनचे तालुकाउपाध्यक्ष याकूब खान, सह शेतकरी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, मदत पुनवर्सन मंत्री, पालकमंत्री,जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांना देण्यात येतील आणि आपण पण प्रशासना मार्फत पाठवाव्या अशी विनंती करण्यात आली.
हे देखील वाचा :
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- BRO Bharti : सीमा रस्ते संघटनेत 10 पाससाठी सरकारी नोकरीची संधी; तब्बल 411 पदांसाठी भरती
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते