गुन्हेजळगाव जिल्हा

ट्रॅकवर दरोडा टाकणारे पाची एलसीबीच्या जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । वाघूर नदीच्या पुलाजवळ ट्रकवर दरोडा टाकून चालकाला लुटणाऱ्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. त्यांच्याकडून लुटलेले दोन मोबाइल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. अशोक समाधान कोळी, सागर नाना कोळी, रुबाब मजीद कोळी, अजय संतोष तायडे व विष्णू कैलास तायडे (सर्व रा. गोद्री, ता. जामनेर) अशी संशयितांची नावे आहेत. लातूर जिल्ह्यातील परतूर येथे माल खाली करून जळगावला येणारा ट्रक (क्र. एम. एच. १९ सी.वाय.६३८६) वाकोद, ता. जामनेर शिवारात वाघूर नदीच्या पुलाजवळ ३० डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता दोन दुचाकींवरून आलेल्या पाच जणांनी अडवून चालक व क्लीनर या दोघांना मारहाण करून त्यांच्याजवळील दोन मोबाइल हिसकावून पळून गेले होते. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

सापळा रचून केली अटक

१ ) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले व त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक अमोल देवढे, हवालदार लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, ईश्वर पाटील व मुरलीधर बारी यांनी खाली ट्रकच का अडविला, याच मुद्द्यावर फोकस करून उमाळा येथे भाग्यश्री पॉलिमर्सला येत असताना त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे असतात म्हणून असे ट्रक अडवून चालकाला लुटले जात असल्याची माहिती मिळाली.

२ ) त्यानुसार तेथील काही जणांचे फोटो काढून ट्रकचालकाला दाखविले असता त्याने ते ओळखले. त्यानुसार पथकाने जामनेर तालुक्यातील फत्तेपूर गाठून सापळा रचत काही जणांना अटक केली.

३ ) त्यानंतर त्यांच्या साथीदारांना पकडण्यात आले. या सर्वांनी गुन्हा कबूल केला आहे. या सर्व संशयितांना पहूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button