जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२१ । नवीन वर्षाच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज जळगाव सराफ बाजारात सोने २२० रुपयाने वधारले आहे. तर दुसरीकडे चांदी ५१० रुपयांनी महागली आहे. आज जळगाव सराफ बाजारात सध्या १० ग्रॅम सोन्याचा दर ४९,२३० रुपये इतके आहे. तर चांदी प्रति किलो ६४,१३०रुपये इतके आहे. सध्या भारतात ओमिक्रॉनसह कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. राज्यात देखील कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. आगामी काळात वाढत्या रुग्ण संख्येने पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने गुंतवणूकदार धास्तावले आहे. यावर्षी २०२२ मध्ये सोने ५५ हजारांच्या पातळीपुढे जाणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
या आठवड्यात जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या (Gold) दरात काहीशी घट दिसून आली. तर दुसरीकडे चांदीच्या (Gold) दरात देखील किंचित घट झाल्याचे दिसून आले. गेल्या आठवड्यात सोने चार वेळा स्वस्त झाले तर एक वेळा महागले, त्यात सोने जवळपास २७० रुपयांनी स्वस्त झाले. तर दुसरीकडे चांदीचे दरात चढ-उतार दिसून आला. चांदी किंचित १५० रुपयांनी स्वस्त झाली आहे. जळगाव सराफ बाजारात १ डिसेंबर २०२१ ला सोन्याचा प्रति तोळा ४८,७२० रुपये इतका होता. तो काल अखेरीस ४९,०१० इतका होता.
गेल्या वर्षभरात (२०२१) सोन्याच्या दरात मोठा बदल झालेला दिसून आला. १ जानेवारी २०२१ रोजा १० ग्रॅम सोन्याचा दर ५१,३३० इतका होता. तर दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा दर ६९,७०० रुपये इतका होता. म्हणजेच या वर्षाच्या उच्चांक पातळीवरून सोने जवळपास २ हजार रुपयांनी स्वस्त आहे. तर चांदी ३५०० हजार रुपयांनी स्वस्त आहे. या ३१ मे २०२१ रोजी सोन्याचा दर ४५ हजार रुपयांच्या घरात होता. तर दुसरीकडे मात्र चांदी ७४ हजार रुपयांच्या घरात होती. त्यानंतर पुन्हा सोने वाढीस लागले होते. तर चांदीत घसरण झाल्याचे दिसून आले.
गेल्या आठवड्यातील सोने चांदीचे दर?
२७ डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,७६० रुपये असा होता. २८ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,७६० रुपये इतका नोंदविला गेला. २९ डिसेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,९८० रुपये इतका नोंदविला गेला. ३० डिसेंबर (गुरुवारी) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,९६० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,२९० रुपये इतका नोंदविला गेला. ३१ डिसेंबर (शुक्रवार) २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ४९,०१० रुपये इतके आहे. तर चांदी प्रति किलो ६२,६२० रुपये इतके आहे.
हे देखील वाचा :
- बाबो..! जळगाव सुवर्णपेठेत सोन्याने गाठला 80 हजाराचा टप्पा; भाव आणखी वाढणार का?
- सोन्याने घेतली उंच भरारी, चांदी देखील महागले,बघूया काय आहेत आजचे भाव…
- बोंबला! आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर सोने चांदीचे दर पुन्हा विक्रमी दिशेकडे.. आताचे भाव पाहिलेत का?
- ग्राहकांना दिलासा! सोने चांदी पुन्हा घसरली..आता कुठपर्यंत आले दर??
- आजचा सोने चांदीचा भाव ; कुठपर्यंत आला दर? तपासून घ्या