जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२२ । जळगाव तालुक्यातील भादली येथील एका ३५ वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोडून देत आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी दुसरी घडलीय. भागवत अशोक फेगडे (वय ३५, रा. भादली) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भादली येथील भागवत फेगडे हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. रविवारी २ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बाहेर जाऊन येतो असे सांगून भादली रेल्वेस्थानक परिसरात धावत्या रेल्वेसमोर झोकुन देत आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे देखील वाचा :
- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणेशोत्सव स्पर्धांतून संस्कृतीचा जागर
- सराफा बाजारात शनिवारी मोठी तेजी! सोने-चांदीत तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ?
- जळगाव रेल्वे स्थानकावरील कामाचा फटका; १२ गाड्या रद्द, अनेकांच्या वेळेत बदल
- मुंबईत लालबागच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या तरुण अभियंत्याचा मृत्यू
- बांभोरी पुलावरून महिलेने घेतली गिरणा नदीत उडी; शोधमोहीम सुरू !










