जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । कोरपावली येथे वर्षिय बादाप्रमाणे हजरत पीर गैबनशह वली यांच्या उर्स निमित्ताने 6 जानेवारी संदल शरीफचा तर 7 जानेवारी उर्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता कव्वालीचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती हिंदू, मुस्लिम पंचकमेटीच्या वतीने कळविण्यात आले.
हिंदू मुस्लिम ऐकतेच प्रतीक मानले जाणारे हजरत पीर गैबनशह वली यांचा गावातील मुख्य चौकात एक भव्य साक्षात मदार असून सालाबादप्रमाणे उर्स निमित्त गुरुवारी बाबांच्या मदारवर संदल काढून साध्या पद्धतीत फुल चादर चढविण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात्रे निमित्ताने सर्व जातीय धर्माचे लोक बाबांच्या दर्ग्यात येऊन फुल चादर चढून आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी शेकडो भक्त बाबांना साकडे घालून मन्त मानून पुढील आयुष्याची वाटचाल करीत असतात परंतु, यंदा कोरोना संसगर्जन्य आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यात रात्री ची जमाव बंदी घालण्यात आली आहे. सदर नियमांचे पालन करीत पोलीस प्रशासनास सहकार्याची भावना समोर ठेऊन, यावर्षी कव्वालीचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती सदर हिंदू, मुस्लिम पंचकमेटीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
आयोजक सरपंच, उप सरपंच, अन्य सदस्य पोलीस पाटील, उपसरपंच अब्दुल सरदार तडवी, पिरण पटेल, जलील पटेल, भिकारी तडवी, अजित तडवी, नारायण अडकमोल, सुनील अडकमोल, रवींद्र तायडे, मूनफ जुमम, महेबूब मुजात, सिकंदर हैदर, गफ्फार नामदार, हमीद सुभान, जलील पटेल, राकेश फेगडे, पोलीस पाटील दत्तात्रय महाजन, राकेश महाजन, अजय बढे, तुळशीराम कोळबे, प्रेमचंद महाले, ऍड. रियाज पटेल, किसन तायडे व स्लिम तडवी यांनी कळविले आहे.
हे देखील वाचा :
- आज धनत्रयोदशी! जाणून घ्या पूजाविधी आणि शुभ मुहुर्त..
- उत्तर महाराष्ट्रातून लोकमत खान्देश पॉलिटिकल आयकॉन पुरस्काराने अमोल शिंदे सन्मानित
- जळगावच्या ज्येष्ठ नागरिकांना आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेण्याची संधी, ६ ऑक्टोबरपर्यंत करा अर्ज
- दहाव्या अजिंठा वेरूळ आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मानद अध्यक्षपदी प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती
- ना.गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने 3 हजार वारकऱ्यांना पंढरपूर वारी