जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । अतिवृष्टीचे जास्तीचे आलेले ५० हजार रुपयांचे अनुदान, जवखेडेसिम (ता.एरंडोल) येथील शेतकऱ्याने २९ रोजी प्रामाणिकपणे प्रशासनाला परत केले. शेतकऱ्याच्या प्रामाणिकपणाचे कौतूक होत आहे. गोरखनाथ माधवराव भदाणे असे शेतकऱ्याचे नाव आहे.
शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान बँक खात्यांद्वारे वितरीत केले जात आहे. जवखेडेसिम (ता.एरंडोल) येथील शेतकरी गोरखनाथ माधवराव भदाणे यांच्या, जिल्हा बँकेच्या निपाणे शाखेतील खात्यावर एक महिन्यापूर्वी ५० हजारांची रक्कम चुकून जमा करण्यात आली होती. गोरखनाथ भदाणे यांनी एरंडोल तहसीलदार सुचिता चव्हाण, ताडे येथील तलाठी मुंडे व जवखेडेसिमचे सरपंच दिनेश पाटील (आमले) यांच्याशी संपर्क साधून प्रशासनाकडून झालेली चूक लक्षात आणून दिली. तसेच शेतकरी गोरखनाथ भदाणे व त्यांचा मुलगा बी.एस.एफ. जवान विजयकुमार भदाणे यांनी, ही रक्कम प्रशासनाला परत करण्याचा निर्णय घेतला. २८ डिसेंबरला बँक खात्यात जमा झालेली रक्कम पिता-पुत्राने काढून बुधवारी प्रशासनाला परत केली.
त्यामुळे प्रशासनाकडून एरंडोल तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी गोरखनाथ भदाणे यांचा तहसील कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. शासनाकडून चुकून आलेली रक्कम परत केल्याबद्दल गोरखनाथ भदाणे यांचे गावात व परिसरात कौतूक होत आहे.
हे देखील वाचा :
- शेतकरी कर्जमाफी आणि महिलांना दरमहा २१०० रुपये ठरणार महायुतीचे ट्रम्पकार्ड
- काँग्रेसशासित राज्यांमध्ये योजनांचा बोजवारा; भाजपाचा हल्लाबोल
- कुणाच्या जाहीरनाम्यावर विश्वास ठेवायचा, महायुती का महाविकास आघाडी? प्रगती पुस्तक जारी
- धारावीचा कायापालट करण्याचा प्रकल्प हाती घेत फडणवीस शिंदे सरकारचा अर्थव्यवस्थेला बूस्टर डोस!
- सर्व घटकांना न्याय आणि एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था