---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

पत्नीच्या संशयावरुन राग, पित्याकडून दोन मुलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ नोव्हेंबर २०२४ । चोपडा तालुक्यातील गौऱ्यापाडा येथील संजय नानसिंग पावरा (२३) याने चारित्र्याच्या संशयावरुन रागाच्या भरात स्वतःच्या दोन लहान मुलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. सुदैवाने १९ वर्षीय पत्नी बचावली पण ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना मध्य प्रदेशात शनिवारी घडली.

sanjay pawara

काय आहे घटना?
चोपडा तालुक्यातील गौऱ्यापाडा येथे संजय नाना सिंग पावरा हा 19 वर्षे आपल्या पत्नी भारती पावरासोबत दोन मुलांसोबत राहत होता. आरोपी संजय पावरा याचे दि. 18 रोजी पत्नी सोबत जोरदार भांडण झाले. त्यामुळे त्याची पत्नी मुलांसह मध्य प्रदेश मध्ये आत्याच्या घरी निघून गेली. संजय पावरा याच्या आई-वडिलांनी तिथे जाऊन भांडण केले. त्यामुळे नातेवाईकांनी तिला माहेरी मध्य प्रदेश मधील देवली येथे सोडून दिले.

---Advertisement---

त्यानंतर पती मुलाला घेऊन देवली येथे गेला व पत्नी सोबत जोरदार भांडण झाले व रागाच्या भरात कुऱ्हाडीने वार करून मुलगा डेविड पाच वर्ष व मुलगी डिंपल तीन वर्ष यांना कुराडीने वार करून जागीच ठार केले व पत्नीवर पाच ते सहा वार केले. भारती पावरा हिने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक धावत आले आणि सदर कृत्य पाहून त्यांनी त्या आरोपीला पकडून ठेवले व पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याने लोखंडी सळईनेही भारतीला मारहाण केली होती. सदर घटना मध्य प्रदेशमधील वरला पोलीस स्टेशन अंतर्गत घडल्याने वरला पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल असून आरोपी तिथे पोलिसांच्या ताब्यात आहे.

या घटनेत पत्नी भारती पावरा तिच्या डोक्याला जबर जखम झाली आहे. मेंदूपर्यंत मार लागला असल्याने तिच्या मेंदूवर धुळे येथील शासकीय रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया झाली तिची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---