जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । चोपडा तालुक्यातील अमेरिका स्थित डॉ.वसंत रूपसिंग जाधव यांना चांदवेडा काव्यसंग्रह साहित्यिक रमेश पाटील भेट म्हणून दिला.
आडगावात जन्मलेले डॉ.वसंत जाधव अमेरिकेतील बोस्टन येथील ‘अनलायलम’ या औषध कंपनीत शास्त्रज्ञ होते. नंतर ते कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट झाले आहेत. त्यांच्या कामगिरीमुळे चोपडा तालुक्याचे नाव सातासमुद्रापार गाजत आहे. रुपसिंग हबा पाटील व अंजनाबाई पाटील या माता-पित्यांना त्यांनी अमेरिकेची सफर घडवली होती. पंचायत समितीचे माजी सभापती भरत जाधव यांचे ते बंधू आणि पाटील गढीवरील जाधव परिवाराचे ते सुपुत्र आहेत. अनेकांनी त्यांचा यशाचे कौतूक केले आहे.
हे देखील वाचा :
- जळगावकरांचे प्रचंड आभारी आहे; “हॅट्ट्रिक” साधून विजयी झाल्यानंतर आ. राजूमामांची प्रतिक्रिया
- जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटीलांचा पुन्हा विजय ; विरोधकांना चारली धूळ
- जळगाव शहरातून राजूमामा भोळे यांची विजयी हॅट्रिक
- जळगाव जिल्ह्यात मविआला धोबीपछाड! सर्वच ११ जागांवर महायुतीचा विजय निश्चित
- LIVE : मतमोजणी सुरू : विधानसभा २०२४ निकाल