⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | निवृत्तीच्या सात दिवसांपूर्वीच मृत्यूने गाठले, दीपनगर केंद्रातील कामगार ठार

निवृत्तीच्या सात दिवसांपूर्वीच मृत्यूने गाठले, दीपनगर केंद्रातील कामगार ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२१ । दीपनगर औष्णिक केंद्रातील २१० मेगावॅट संचाच्या सात ए कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकून फेकरी (ता. भुसावळ) येथील अशोक बाबुराव हातकर (वय ५८) या कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अशोक हातकर ३१ डिसेंबरला निवृत्त होणार होते, त्यापुर्वीच त्यांना मृत्यूने गाठले. या अपघातामुळे दीपनगरातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दीपनगर केंद्रातील २१० मेगावॅट संचाच्या ७ – ए या कन्व्हेअर बेल्टच्या स्वच्छतेचे काम मे. पुजा इंटरप्राईजेस या फर्मने घेतले आहे. या कंपनीत अशोक हातकर कंत्राटी कामगार होते. शुक्रवारी रात्री ते कन्व्हेअर बेल्ट सफाईचे काम करत होते. सीएचपी विभागातून बॉयलरला कोळसा पुरवठा करणाऱ्या कन्व्हेअर बेल्टच्या दोन्ही बाजूंनी पडणारा कोळसा स्वच्छतेचे काम दैनंदिन केले जाते. हे काम करीत असताना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान बी बेल्टवर असलेल्या कामगारांना मोठा आवाज आल्याने त्यांनी सात- ए बेल्टकडे धाव घेतली. त्यांना अशोक बाबुराव हातकर बेल्टमध्ये अडकल्याचे दिसून आले. अंत्यत अवजड असलेल्या बेल्टमध्ये पडल्याने हातकर यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला, तर उजवा पाय मांडीपासून तुटला, यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ग्रामीण रुग्णालय व ट्राॅमा सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयुर चौधरी यांनी शवविच्छेदन केले. या प्रकरणी सुरेश मोरे (रा. कंडारी) यांनी दिलेल्या खबरीवरुन तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

महानिर्मिती प्रशासनातर्फे दोन लाखांची मदत
कंत्राटी कामगार अशोक हातकर यांच्या अपघाती मृत्यूनंतर महानिर्मिती प्रशासनातर्फे, त्यांच्या वारसांना दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार अाहे. या बाबत महानिर्मिती भुसावळचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकाऱ्यांनी कार्यालयीन प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.