भुसावळ

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ; भुसावळ विभागातील ‘या’ १३ रेल्वे गाड्या आज उशिराने धावणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । भुसावळ‎ मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील (Bhusawal division) नांदगाव स्थानकाजवळ (दुपारी १.१५ ते सायंकाळी ५.१० या वेळात पादचारी पुलाचे‎ काम होणार आहे. यामुळे मंगळवार व बुधवार (२१ व २२ डिसेंबर) असे‎ दाेन दिवस चार तासांचा ब्लाॅक घेण्यात आला आहे. त्यामुळे अप-डाऊन मार्गावरील तब्बल १३‎ रेल्वे गाड्या विभागातील विविध‎ रेल्वे स्थानकांवर थांबवल्या‎ जातील.‎

या गाड्यांमध्ये डाउन मार्गावरील बंगळुरू-न्यू दिल्ली एक्स्प्रेस‎ हिसवळ स्थानकावर दुपारी ३.२० ते ५.१५ अशी १.५५ तास,‎ एलटीटी-छपरा एक्स्प्रेस‎ (मंगळवार, गुरूवार व शनिवार) ‎ ‎ दुपारी ३.२५ ते ५.१५ अशी १.५० तास ‎ ‎ मनमाड, नांदेड-निजामुद्दीन ‎ ‎ (मंगळवार) व यशवंतपूर-चंदीगड‎ या गाड्या मनमाड स्थानकावर ३.३५‎ ते ५.२५ या वेळात १.५० तास, ‎ ‎ मुंबई-पटना (मंगळवार, शुक्रवार)‎ ही गाडी ३.२५ ते ५.१५ अशी १.५०‎ तास समीट स्थानक, एलटीटी-जय‎ नगर एक्स्प्रेस लासलगाव‎ स्थानकावर दुपारी ३.४० ते ५.१५‎ अशी १.३५ तास, एलटीटी-कामाख्य‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎

गाडी निफाड स्थानकावर ४.४० ते‎ ५.१५ अशी ३५ मिनिटे,‎ एर्नाकुलम-निजामुद्दी न एक्स्प्रेस‎ सायंकाळी ५.१० ते ५.२० अशी १०‎ मिनिटे कसबे सुकेने स्थानकावर‎ थांबवण्यात येईल.‎ अप मार्गावरील स्थिती‎ अप मार्गावरील न्यू‎ दिल्ली-बंगळुरू एक्स्प्रेस‎ दुपारी ३.०४ ते सायंकाळी‎ ५.१५ म्हणजे २.१० तास‎ पिंपरखेड स्थानक,‎ प्रयागराज-एलटीटी‎ (मंगळवार, गुरूवार) ही‎ गाडी दुपारी ३.२० ते ५.१५ या‎ १.५५ तास न्यायडोंगरी‎ स्थानक, हावडा- मुंबई‎ एक्स्प्रेस दुपारी ३.३० ते ५.१५‎ या १.४५ तास हिरापूर‎ स्थानक, लखनऊ-मुंबई‎ एक्स्प्रेस ३.३५ ते ५.१५ अशी‎ १.४० तास चाळीसगाव,‎ हावडा-मुंबई एक्स्प्रेस ३.५५‎ ते ५.१५ अशी १.२० तास‎ वाघळी, वाराणसी-एलटीटी‎ कजगाव स्थानकावर ४.३० ते‎ ५.१५ अशी ४५ मिनिटे.‎ ‎

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button