धक्कादायक : एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

डिसेंबर 18, 2021 3:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । राज्य शासनाकडून एस.टी.कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा निघत नसल्याने अनेक कर्मचारी दडपणात आहेत. कारवाईची भीती व ताण-तणावामुळे मुक्ताईनगर आगारातील बसचालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. जितेंद्र गोपाळ नाथजोगी (४५, रा.जोगीवाडा, मुक्ताईनगर) असे या बसचालकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी त्याच्या घरी घडली.

st bus

नोकरीवरून कमी करतील, अशी भीती त्यांच्या मनात होती. त्यामुळे त्यांना नैराश्य आले होते. या ताण-तणावातून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे त्यांच्या परिवारातील सदस्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या पश्च्यात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. ते जगदीश नाथजोगी यांचे भाऊ होत. घटनेची माहिती मिळताच परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने अंत्यविधीसाठी पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now