जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । अमळनेर तालुक्यातील जैतपीर येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी संजय शिवराम सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जैतपीर ग्रामपंचायतीत सुरेखा रविंद्र देशमुख यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सदर जागा रिक्त झाल्यामुळे त्या जागेवर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत संजय सोनवणे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. संजय सोनवणे हे अमळनेर शहरातील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उपशिक्षक या पदावर कार्यरत आहेत.
या निवडीबद्दल डी.डी.पाटील चेअरमन,धनदाई माता एज्युकेशन सोसायटी अमळनेर तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल, के.डी.पाटील प्राचार्य जय योगेश्वर माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर तथा उपाध्यक्ष धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी अभिनंदन केले. तसेच सर्व जैतपीर ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ तसेच शैक्षणिक, सामाजिक, राजकीय अशा सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.