⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | यावलहुन शेळगाव बॅरेज मार्गे जळगाव रस्ता वाहतुकीसाठी खुला

यावलहुन शेळगाव बॅरेज मार्गे जळगाव रस्ता वाहतुकीसाठी खुला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ डिसेंबर २०२१ । यावल‎ तालुक्यातून बोरावल-टाकरखेडा‎ मार्गे तापी नदीतून शेळगावकडून‎ जाणारा जळगाव रस्ता सुरू झाला‎ आहे. यामुळे यावलहुन जळगावकडे जाणाऱ्या वाहनधारकांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. हा रस्ता शुक्रवारी दुपारपासून‎ वाहतुकीला खुला करण्यात आला.‎

दरवर्षी पावसाळ्यात तापी नदीला पूर आल्यावर हा मार्ग बंद पडत असतो. साधारणपणे पावसाळ्यात तीन-चार महिने हा मार्ग होत असतो. त्यामुळे यावल परिसरातील नागरिकांना जळगाव जाण्यासाठी भुसावल आणि किनगाव मार्गे जावे लागले.  भुसावल आणि किनगाव मार्गे जळगाव हे अंतर ५० किलोमीटर आहे. परंतु शेळगाव मार्गे हेच अंतर फक्त अवघ्या 28 किलोमीटर येते.

दरम्यान, शेळगाव बॅरेज जवळ आता पाणी ओसरले‎ असून नदीपात्रात पाइप टाकून‎ कच्चा रस्ता तयार केला. शुक्रवारी‎ दुपारपासून हा रस्ता वाहतुकीसाठी‎ खुला करण्यात आला. यामुळे शेळगाव बॅरेज‎ मार्गे रस्ता सुरू झाल्याने कमी अंतर‎ व कमी वेळेत टोल वाचवून‎ जळगावला पोहोचणे शक्य होईल.‎

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.