भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

डिसेंबर 15, 2021 4:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ डिसेंबर २०२१ । जळगाव-नशिराबाद दरम्यानच्या महामार्गावरील सरस्वती फोर्ड शोरूमनजीक एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना १३ रोजी घडली. बापूराव चैत्राम शिलावट असे मृताचे नाव असून याप्रकरणी १४ रोजी ट्रक चालकाविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

accident

नशिराबाद येथील बापूराव शिलावट हे जळगावहून नशिराबादकडे (एमएच १९ डीटी ४०२६) या दुचाकीने येत असताना सरस्वती फोर्ड शोरूमजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक (आरजे ४७ जीए ९५४) याने जोरदार धडक दिली.

या धडकेत बापूराव चैत्राम हे गंभीर जखमी झाले. त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. यासंदर्भात मयताचा मुलगा दिनेश बापूराव सिलावट यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक चंद्रलाल हिरालाल (पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरोधात मंगळवार १४ डिसेंबर रोजी दुपारी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now