जळगावात गांधी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरून एकाने घेतली उडी, प्रकृती गंभीर

डिसेंबर 13, 2021 12:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२१ । शहरातील महात्मा गांधी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरून एकाने उडी घेतल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, उडी घेणाऱ्या व्यक्तीचे नाव ज्ञानेश्वर वामन मिस्त्री रा.कमळगाव असून त्याला उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

jalgaon news

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, जळगावात उपचार सुरू असल्याने चोपडा तालुक्यातील कमळगाव येथील ज्ञानेश्वर वामन मिस्तरी (वय ४५) हा व्यक्ती शहरातील गांधी मार्केटजवळ राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे आला होता. उपचार सुरू असल्याने तो बहिणीच्या घरी होता.

सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास त्याने आपल्या बहिणीला आपण रुग्णालयात जात असल्याचे सांगून तो बाहेर गेला. मात्र दवाखान्यात न जाता त्याने गांधी मार्केटमध्ये वर चढून तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भर दिवसा ऐन वर्दळीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तर, नागरिकांनी धाव घेऊन जखमी अवस्थेत असलेल्या मिस्तरी यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now