पाणी तापवताना इलेक्ट्रिक हिटरचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू

डिसेंबर 12, 2021 12:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२१ । इलेक्ट्रॉनिक हिटरने पाणी तापवत असताना विजेचा धक्क्याने एका विवाहितेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी सकाळी जळगाव शहरातील वाल्मीक नगरात घडलीय. अश्विनी रोहित सपकाळे (वय 22) असे मयत विवाहितेचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान,  या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते

crime jpg webp

याबाबत असे की, शहरातील वाल्मिक नगरमध्ये अश्विनी सपकाळे या पती रोहित कैलास सपकाळे यांच्यासह सासू, सासरे, दीर यांच्यासह वास्तव्याला आहे. आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास पती रोहित आणि सासू हे दोघे नातेवाईकांना भेटण्यासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आले होते. त्यावेळी विवाहिता घरी एकट्याच होत्या.

यावेळी त्यांना इलेक्ट्रॉनिक हिटरने पाणी तापवत असताना विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.  त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. दरम्यान विवाहितेच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी करुन एकच आक्रोश केला होता. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now