अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा संशयित नराधम जेरबंद, पोलिसांनी असा घेतला शोध

डिसेंबर 9, 2021 1:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ । अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी बुधवार दि.८ रोजी सापळा रचून सावखेडा (ता.जळगाव) येथून अटक केली. संशयिताच्या मोबाइल लोकेशनवरुन पोलिसांनी त्याचा माग काढला.

निंभोरा (ता.धरणगाव) येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना दि.६ रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी ७ रोजी सायंकाळी धरणगाव पोलिस ठाण्यात पीडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर संशयित तरुण पसार झाला होता. धरणगाव पोलिसांचे एक पथक तेव्हापासून संशयिताचा शोध घेत होते. त्यानुसार पोलिसांनी मोबाइल लोकेशनच्या मदतीने संशयित तरुणाला बुधवार दि.८ रोजी जळगाव तालुक्यातील सावखेडा परिसरातून ताब्यात घेतले. धरणगावचे पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल मोती पवार, राजू कोळी यांनी संशयितास २४ तासांच्या आत अटक केली. पुढील तपास अमोल गुंजाळ करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now