⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | Gold Silver : आजचा सोने-चांदीचा भाव, ७ डिसेंबर २०२१

Gold Silver : आजचा सोने-चांदीचा भाव, ७ डिसेंबर २०२१

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२१ । भारतात कोरोनाच्या नव्या ‘ओमिक्रॉन’चे रुग्ण हळूहळू वाढताना दिसून येत आहे.  यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात किंचित वाढ झालेली दिसून आली असून दुसरीकडे चांदीच्या भावात घसरण झाली आहे. जळगाव सराफ बाजारात आज सोने १० रुपयाने महागले आहे. तर चांदी २५० रुपयाने स्वस्त झाली आहे. त्यापूर्वी काल सोने ५२० रुपयाने महागले होते तर चांदी प्रति किलो ४०० रुपयाने महागली होती.

आजचा जळगावातील सोने-चांदीचा भाव :

आज मंगळवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव ४९,०४० रुपयांवर गेला आहे. तर चांदी ६२,७१० प्रति किलो इतक्यावर आला आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

सध्या लग्नसराई जोरात सुरु आहे. अशातच जर तुमच्याही घरी लग्नसोहळा पार पडणार असेल आणि त्यासाठी तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर गेल्या वर्षीपेक्षा सोनं यंदा स्वस्त झालं आहे. त्यामुळे सोने खरेदीची संधी आहे. तसेच गेल्या आठवड्यात जळगाव सराफ बाजार सोन्याच्या भावात किंचित १९० रुपयाची घसरण दिसून आली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. चांदीचा २०७० रुपयाची घसरण झालेली आहे.

गेल्या आठवड्यातील असे होते दर?

२९ नोव्हेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,५०० रुपये असा होता. ३० नोव्हेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,०८० रुपये असा होता. १ नोव्हेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७२० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,०९० रुपये इतका आहे. २ नोव्हेंबर (गुरुवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,६९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,९०० रुपये इतका आहे. ३ नोव्हेंबर (शुक्रवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,३२० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६२,०७० रुपये इतका आहे.

55000 रुपयांवर पोहोचू शकतं सोनं 

बाजारातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं जगाची धाकधुक वाढवली आहे. तसेच याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किमतींवरही होण्याची शक्यता आहे. नव्या व्हेरियंटमुळे येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अनेक देशांमध्ये नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. केडिया कमोडिटीचे डायरेक्टर अजय केडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या वर्षभरात सोन्याचे दर 55 हजार रुपये 10 ग्राम इतके पोहोचण्याची शक्यता आहे.

सोन्याची शुद्धता कशी ओळखतात?

सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916, किंवा 875 असे अंक लिहलेले असतात. याच अंकावरून सोन्याची शुद्धता लक्षात येतं. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर, सोने 24 कॅरेट असतं. 999 चा अर्थ असा आहे की, यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर, 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात. सोनं जितकं जास्त कॅरेटचं तितकी त्याची गुणवत्ता चांगली. त्यामुळं त्याची किंमतही वाढत जाते. हॉलमार्क असणे ही सरकारी गॅरंटी असून ग्राहकांनी सोने खरेदी करताना त्यावर हॉलमार्क चिन्ह आहे का? याची तपासणी करावी आणि त्याची खरेदी करावी असं आवाहन केंद्रीय ग्राहक मंत्रालयाच्या वतीनं करण्यात आलंय

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.