जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ । आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढीचा परिणाम स्थानिक बाजारांवरही झालेला दिसून आला. आज बुधवारी जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या भावात किंचित वाढ झालेली दिसून आली. तर दुसरीकडे चांदीच्या भावातही किंचित वाढ झालेली आहे. आज १० ग्रॅम सोने २० रुपयाने महागले तर चांदी १० रुपयांनी वाढली. त्यापूर्वी काल सोने स्थिर होते तर चांदी प्रति किलो ४२० रुपयांनी स्वस्त झाली होती.
आजचा जळगावातील सोने-चांदीचा भाव :
आज मंगळवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २० रुपयांनी वाढून तो ४८,७२० रुपयांवर गेला आहे. तर चांदी भाव १० रुपयांनीवाढून ६३,०९० प्रति किलो इतक्यावर आला आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.
कोरोनाचा आतापर्यंतचा घातक विषाणू आढळून आल्यानंतर जगभरात प्रचंड खळबळ माजली आहे. यामुळे पुन्हा अर्थव्यवस्था संकटात जाईल या भीतीने गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीकडे धाव घेतली आहे. कोरोनाच्या नव्या वेरिएंटमुळे सोने चांदी महागणार असल्याचा अंदाज वर्तविला गेला होता. मात्र मागील काही दिवसापासून सोन्याच्या भावात फारशी वाढ दिसून आलेली नाहीय. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात १६०० रुपयांची घसरण दिसून आली.
तर दुसरीकडे चांदीचा भावात देखील मोठी घसरण दिसून आली. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात ३५०० हजाराची घसरण दिसून आली. तर गेल्या तीन दिवसात चांदी दीड हजाराहून अधिकने स्वस्त झालेली आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात सोने आणि चांदीच्या भावात मोठी हालचाल दिसून आली.
नोव्हेंबरच्या सुरुवातीला सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ४८,७५० रुपये इतका होता. त्यानंतर दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव काहीसा स्थिर होता. परंतु दिवाळीनंतर सोन्याच्या भावात वाढ होत असल्याचं दिसून आलं. ११ नोव्हेंबर ला सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५० हजार रुपयांवर गेला होता. मात्र, गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव घसरताना दिसून आला. सध्या सराई सुरु असल्यामुळे सोने चांदीच्या भावात मागणी वाढू लागली आहे. कोरानाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाल्याने सोन्याचे भाव पुन्हा वाढू शकतात. त्यामुळे आताच स्वस्तात सोने खरेदी संधी आहे.
२९ नोव्हेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,५०० रुपये असा होता. ३० नोव्हेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७०० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,०८० रुपये असा होता. १ नोव्हेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७२० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,०९० रुपये इतका आहे.
अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता
आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.