जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । जळगाव शहरातील राजीव गांधीनगरातील एका उकीरड्यावर २० ते २२ आठवड्याचे अर्भक मृतावस्थेत आढळून आल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील राजीव गांधीनगरातील एका उकीरड्यावर मंगळवार दि.३० रोजी स्वप्नील चौधरी यांना २० ते २२ आठवड्याचे अर्भक मृतावस्थेत आढळून आले. दरम्यान, त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नितेश बच्छाव, हरिश डोईफोडे, सुशिल चौधरी आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ते अर्भक ताब्यात घेतले. त्यानंतर ते अर्भक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी या अर्भकाची तपासणी करून त्यास मृत घोषित केले.

याप्रकरणी स्वप्निल चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून या बाळाच्या आईचा शोध घेतला जात आहे.












