जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२१ । जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणाबाहेर गेला असून, दिवसेंदिवस बाधितांचा आणि मृतांचा आकडा वाढताच आहे. आज देखील जिल्ह्यात एकूण १ हजार १९६ नवीन बाधित आढळून आले आहेत. तर आज कोरोनामुळे तब्बल १५रूग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात साधारण महिनाभरापासून संसर्ग वाढताच आहे. सातत्याने आकडा वाढत असून संपुर्ण जिल्हाच आता हॉटस्पॉट बनला आहे. आज सर्वाधिक ३६२ रुग्ण चोपडा तालुक्यात आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या ८३ हजार १६५ झाली आहे. त्यात एकूण ७० हजार ८७७ रूग्ण बरे झाले आहे. जिल्ह्यात महिनाभरापासून वाढणाऱ्या संसर्गामुळे ॲक्टिव्ह रूग्णांचा आकडा देखील वाढत असून सद्यस्थितीत १० हजार ७३४ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, आज जिल्ह्यात १५ रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण १ हजार ५५४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
असे आढळले रुग्ण
जळगाव शहर 252, जळगाव तालुका-05; भुसावळ ९९, अमळनेर- 95; चोपडा- ३६२; पाचोरा ३०; भडगाव ०९; धरणगाव ६७; यावल ३५; एरंडोल २८, जामनेर ८४; रावेर २८, पारोळा २५; चाळीसगाव ४०; मुक्ताईनगर ०१; बोदवड-२६ आणि इतर जिल्ह्यातील १० असे ११९६ रूग्ण आढळून आले आहेत.