⁠ 
सोमवार, ऑक्टोबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | आ.मंगेश चव्हाणांच्या दणक्याने कन्नड घाट अवजड वाहतुकीसाठी खुला

आ.मंगेश चव्हाणांच्या दणक्याने कन्नड घाट अवजड वाहतुकीसाठी खुला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चाळीसगाव येथून जवळच असलेल्या औरंगाबाद चाळीसगाव जोडणार्या कन्नड औट्रम घाटात काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने अवजड वाहतुकीसाठी घाट बंद करण्यात आला होता.परंतु काही दिवसांपासून घाटात ड्यूटीवर असणारे पोलिस अवैधरित्या अवजड वाहनांना ५०० ते १००० रुपये घेऊन रात्री परवानगी देत असल्याचे लक्षात आल्याने चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वतः ट्रक ड्रायव्हर बनून स्टींग ऑपरेशन करत पोलीस डिपार्टमेंट ची पोलखोल केली.यामुळे पुन्हा एकदा पोलीस विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली असून गृहविभागाने पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या १०० कोटी वसुली चे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

दरम्यान या आ.मंगेश चव्हाण यांच्या स्टींग ऑपरेशन मुळे गृहविभागाची वसुली पुन्हा एकदा चर्चेत आल्याने कदाचित राज्यसरकारने या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी कन्नड घाट अवजड वाहतुकीसाठी खुला करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.

दोशी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी?

दरम्यान या सर्व प्रकारामुळे जे पोलीस अधीकरी आणि कर्मचारी याठिकाणी अवैधरित्या ५०० ते १००० रुपये प्रत्येक अवजड वाहनांना आकारुन बंदी असतांना अवजड वाहनांना प्रवेश देत होते त्यांच्यावर राज्य सरकार तसेच गृहविभाग कारवाई कधी करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने २४ रोजी रात्रीपासून घाट खुला केल्याने प्रश्नचिन्ह

कन्नड घाट अवजड वाहतुकीसाठी खुला करीत असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जाहीर केले असून दि.२४ नोव्हेंबर रात्री ०८ वाजेपासून हि परवानगी दिली असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जाहीर केले आहे.

दरम्यान आ.मंगेश चव्हाण यांनी स्टींग ऑपरेशन केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कन्नड घाट अवजड वाहतुकीसाठी खुला करीत असल्याचे जाहीर केल्याने व दि.२४ रोजी रात्री ०८ वाजेपासून खूला करत असल्याचे जाहीर केल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण किंवा पोलिस डिपार्टमेंट भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

घाट अवजड वाहनांना खुला करण्याचे आदेश पण पोलीस वसुली करण्यात व्यस्त-आ.मंगेश चव्हाण

यासंदर्भात शहानिशा करण्यासाठी आ.मंगेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की कन्नड घाट अवजड वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा असे आदेश असतांना देखील संबंधित पोलीस कर्मचारी अवैधरित्या वाहनधारकांकडून ५०० ते १००० रुपये वसूल करत असल्याचे दिसून आले आहे.यासंदर्भात आ.चव्हाणांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची तक्रार केली असून अद्यापपर्यंत गृहविभागाने दोषी पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.