जळगाव जिल्हा
सोशल मीडियातील व्हिडिओला महिलेच्या नावाने अश्लील शीर्षक; गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईटवर बनावट खाते तयार करून त्यात हिंदी गाण्यावर व्हिडीओ तयार करून त्याला दोन महिलांच्या नावे अश्लील शीर्षक देऊन बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २२ नोव्हेंबरपासून हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्ह्यातील एका खेडेगावातील व्यक्तीच्या नावाने कोणी तरी खोडसाळपणा करीत त्याच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार केले. तेथे हिंदी गाण्यावर एक व्हिडीओ तयार करण्यात आला. त्याला या व्यक्तीच्या नात्यातील दोन महिलांच्या नावाने अश्लील शीर्षक देऊन ते व्हायरल करण्यात आले.