⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार ; आयएमडीकडून दोन दिवस ‘येलो अलर्ट’ जारी

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार ; आयएमडीकडून दोन दिवस ‘येलो अलर्ट’ जारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२४ । प्रतीक्षेत असलेला मान्सून अखेर ६ जून रोजी महाराष्ट्रात पोहोचला असून यांनतर आता महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पुढचे चार पाच दिवस मुसळधार पावसाचा असल्याचा इशारा आयएमडीने दिला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मागील चार पाच दिवसापासून जळगावसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व सरी कोसळत आहे. जळगावात गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाला. दिवसभर अंगाची लाहीलाही होत असून सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाच्या सरी बरसत आहे. यातच आता नैऋत्य मान्सून देखील दक्षिण महाराष्ट्रात दाखल झाला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आगामी चार पाच दिवस जोरदार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी ७ आणि ८ जूनला पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची देखील शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, जळगावला आठवडाभर मान्सून ची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र सध्या मान्सून पूर्व पाऊस होत असल्याने जळगावचा तापमानाचा पारा घसरला आहे. गुरुवारी जळगावचे तापमान ४० अंशखाली नोंदविले गेले. सध्या तापमान घसरले असले तरी उकाडा मात्र कायम आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.