घरात घुसून अत्याचाराची धमकी, तरुणावर गुन्हा

नोव्हेंबर 24, 2021 1:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ ।  एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग करत तिच्यावर अत्याचाराची धमकी दिल्याचे समोर आले आहे. सागर युवराज गवळी ( वय माहित नाही ) असे त्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलिसात  गुन्हा दाखल झाला आहे.

crime

सविस्तर असे की, रविवारी रात्री अल्पवयीन मुलगी घरात असताना सागर हा तिच्या घरात घुसला. त्याने पीडितेच्या आईची ओढणी ओढली. तसेच पीडिता आईला सोडविण्यासाठी गेली असता सागर गवळी याने पीडितेसोबत अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केला. तसेच अश्लील शिवीगाळ करून मुलीवर अत्याचार करण्याची धमकी दिली.

सोमवारी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून शनीपेठ पोलिसात सागर गवळी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास महिला पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहेत.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now